गडचिरोली : छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत एका जहाल नेत्यासह नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलीस जवानांना यश आले आहे. यात पाच महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर एकूण ६० लाखांपेक्षा अधिक बक्षीस होते, अशी माहिती बस्तर क्षेत्राचे महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी ४ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्तीसगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमाभागातील लोहगाव पुरंगेल एन्ड्री जंगल परिसरात सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास जिल्हा राखीव दल (डीआरजी) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून (सीआरपीएफ) संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान रबविण्यात आले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. दरम्यान, पोलिसांनी देखील प्रत्युत्तर दिले.

हे ही वाचा…भाजप-संघ समन्वयकाच्या प्रश्नावर आंबेडकरांनी भाष्य का टाळले?

यावेळी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. सात तास चाललेल्या या चकमकीत ९ नऊ नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आहे. यात वारंगल येथील रहिवासी नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य विशेष झोनल समितीचा सदस्य रणधीरचा देखील मृत्यू झाला. त्याच्यावर ३० लाखापेक्षा अधिक बक्षीस होते. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती व परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली. यावेळी घटनास्थळावरून एसएलआर, ३०३ आणि १२ बोरची हत्यारे तसेच मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली आहे. या वर्षभरात छत्तीसगडमध्ये झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत तब्बल १५३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

तर ६६९ नक्षल्यांना अटक करण्यात आली असून ६५६ जणांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये अनेक मोठ्या नक्षल नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाडमध्ये पोलिसांनी मोठ्या कारवाया केल्या आहेत. यापूर्वी या भागात सामान्य माणसालाही प्रवेश करणे सोपे नव्हते. परंतु पोलिसांनी येथील काही भागात मदत केंद्र उघडल्याने नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले आहे.

हे ही वाचा…अतिवृष्टीचे थैमान… बुलढाणा जिल्ह्यात पिकांची अतोनात नासाडी; सुपीक शेती खरडून गेली

‘एफओबी’ मुळे नक्षलवाद्यांची कोंडी

नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या अनुषंगाने नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात गुप्तचरावर आधारित कारवाईसाठी तसेच दुर्गम गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी नागरी अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस (एफओबी) उघडण्यास गती दिली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरपासून ३३ एफओबी स्थापन करण्यात आले आहेत. या माध्यमातून नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी मदत होत आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांची चारही बाजूने कोंडी झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine naxalites killed in encounter at chhattisgarh with prominent leader ssp 89 sud 02