नागपूर : कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वेद वैदिक विज्ञान विभाग तथा शास्त्रविद्यागुरुकुलम् यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवशीय कर्मकांड प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन ०६ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दरम्यान विद्यार्थ्यांना दररोज सायंकाळी ३.३० ते ५.३० या वेळेत प्रशिक्षण दिले जाईल. कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेत आयोजित या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन महर्षी पाणिनी संस्कृत व वैदिक विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. सी. जी. विजय कुमार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय विद्यापीठ नवी दिल्लीचे प्राध्यापक गोपालप्रसाद शर्मा विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करतील.

हेही वाचा – एसटीच्या इलेक्ट्रिक बस तोट्यात, सरासरी एका किलोमीटर मागे…

या प्रशिक्षण वर्गात धार्मिक अनुष्ठानांचे शास्त्रीय विधी आणि नियम शिकविले जातील. विशेषत: धार्मिक मंत्रांच्या उच्चारणात ज्या विसंगती व दोष आढळून येतात ते दूर करून शास्त्रीय विधी शुद्ध स्वरुपात प्रसारित करणे हा या कार्यशाळेचा महत्त्वाचा उद्देश आहे. उपरोक्त कार्यशाळेच्या आयोजनाकरिता वेदविद्यासंकाय अधिष्ठाता प्रो. हरेकृष्ण अगस्ती यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. कार्यशाळेत वेदवैदिक विज्ञान विभाग प्रमुख डॉ. अमित भार्गव आणि शास्त्रगुरुकुलम् तथा वेदविभागीय सदस्यांनी विद्यार्थी मार्गदर्शन करतील.

कर्मकांड म्हणजे विधि करणे होय. विधि करणे अर्थात पूजा अर्चना करणे, त्यातून भक्ति भावाने विश्वस्त प्रेरणा मिळवणे असा अर्थ होतो. हिंदू धर्मात याचा वापर अधिकाधिक आहे. म्हणून कर्मकांड या पारंपरिक पद्धतिनुसार क्रियात्मक रूप देऊन पूजा अर्चा करतात.

हेही वाचा – आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आर्थिक मदत, कोण ठरेल पात्र?

कर्मकांड अभ्यासक्रम या विषयावर खालील संस्कृत विद्यापीठांमध्ये अभ्यास केला जातो :

  • संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ, वाराणसी: या विद्यापीठात कर्मकांड अभ्यासक्रमातून हिंदू विधी, समारंभ आणि धार्मिक परंपरा यांच्या तत्त्वे आणि पद्धतींचा अभ्यास केला जातो. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार आणि विधी अचूकपणे आणि आदराने पार पाडण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळतात.
  • कुमार भास्कर वर्मा संस्कृत आणि प्राचीन अध्ययन विद्यापीठ: या विद्यापीठात कर्मकांड या विषयावर डिप्लोमा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
  • उत्तराखंड संस्कृत विद्यापीठ: या विद्यापीठात कर्मकांड या विषयावर पीजी डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
  • रामटेक येथील संस्कृत विद्यापीठामध्येही कर्मकांज, ज्योतिषविद्या अशा विविध विषयांवर अभ्यासक्रम शिकवले जातात. विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विविध शिबिर आणि कार्यशाळांचे आयोजन केले जाते.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ritual training workshop organized in association with department of ved vedic science and shastravidya gurukulam of kavikulaguru kalidas sanskrit university dag 87 ssb