बुलढाणा: संत सखाराम महाराज यांनी आपल्या हयातीत सुरू केलेल्या श्रीसंत सखाराम महाराज संस्थानच्या पंढरीच्या वारीची परंपरा आजही कायम आहे. हभप तुकाराम महाराजांच्या नेतृत्वात श्रीसंत सखाराम महाराज संस्थान सखारामपुर (इलोरा)ची पालखी  आषाढीकरिता रवाना झाली आहे. जिल्ह्यातील  सर्वात जुनी असलेली ही पायदळ वारी २७ जूनला  पंढरपूर येथे दाखल होणार आहे. वारीत अडीचशे ते तीनशे  वारकऱ्यांचा  सहभाग आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीसंत सखाराम महाराजांनी आपल्या  जीवन काळात  तब्बल साठ वर्षे पंढरपूरची  पायीवारी केली.  ही परंपरा पुढे गुरुवर्य श्रीराम महाराज (बोवासाहेब) यांनी कायम ठेवली. त्यांच्यानंतर ही परंपरा श्रीसंत सखाराम महाराज संस्थानचे विद्यमान अध्यक्ष  तुकाराम महाराज हे चालवीत आहे.  दिंडी चालक म्हणून  मुकुंदा बुवा सखारामपुरकर हे  आहेत. २३ दिवसाचा पायी प्रवास करित २७ जूनला  पंढरपूर येथे पोहचेल.

हेही वाचा >>> मुक्ताबाईंची पालखी निघाली पंढरपुरा! तब्बल तीन शतकांची परंपरा

भास्तन, माटरगाव, माक्ता, खामगाव, अंत्रज, हिवरखेड, गणेशपुर, उंद्री, टाकरखेड, दिवठाणा, चिखली, रामनगर, वाकी, टाकरखेडा, कुंभारी, कुंबेफळ, गणपती मंदिर जामवाडी, जालना, मेठ पिंपळगाव, लालवाडी, रामनगर तांडा, शहापूर, महाकाळ, नागझरी, गेवराई ,पांडळशिंगी ,पेंडगाव, बीड, पाली, मोरगाव, चौसाळा, पिंपळगाव, ईजोरा, वाकवड, भूम, देवळाली, मांडेगाव, बार्शी, खांडवी, रिधोरे, माढा, उपलाई ,शेटफळ, आष्टी, विसावा  या मार्गे  ही पायी पालखी दिंडी  पंढरपूर येथे  २७ ला पोहोचणार आहे.

नेत्यांचीही मांदियाळी

तुकाराम महाराज हे खामगावपर्यंत दिंडीसोबत राहणार असून त्यानंतर ते आळंदी येथील माऊलीच्या दिंडीमध्ये सामील होऊन आळंदी ते पंढरपूर अशी पायीवारी करतील. पालखीत भेंडवळपर्यंत निरोप देणारे शेकडो भाविक सहभागी झाले होते. तसेच मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती, राज्य पणन महासंघाचे संचालक प्रसेनजीत पाटील, संस्थांनचे व्यवस्थापक श्रीकृष्ण दादा पाटील, विश्वस्त गोपाळ बुवा उरळकर, स्मिता  पाटील, मनोहर पाटील , अनिल बकाल, प्रा. नानासाहेब कांडलकर ,प्रमोद सपकाळ, भारत राष्ट्र समितीचे समन्वयक राजेश पाटील शीत्रे , तूकाराम पाटील, रूपराव पाटील, अरविंद पाटील, दीपक पाटील, दत्ता मोरखडे, भागवत अवचार यांचा प्रमुख सहभाग होता. ही सर्व मंडळी भेंडवळ पर्यंत साडेचार किलोमीटर वारीत पायदळ चालले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sakharam maharaj sansthan palanquin to pandharpur the tradition continues scm 61 ysh