Samriddhi highway and Metro inauguration by the Prime Minister narendra modi said devendra fadanvis nagpur | Loksatta

नागपूर : समृद्धी महामार्ग, मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांच्याच हस्ते – फडणवीस

शहरातील मेट्रोच्या कामठी व पार्डी मार्गावरील मार्गिकांची कामे पूर्ण झाली आहे. तसेच समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा आहे.

नागपूर : समृद्धी महामार्ग, मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांच्याच हस्ते – फडणवीस
देवेंद्र फडणवीस

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग व शहरातील मेट्रोच्या दोन मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते लवकरच होईल. त्यासाठी त्यांच्याकडे वेळ मागण्यात आली आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा- नागपूर : दसऱ्याला ८५ हजार जणांनी केला मेट्रोने प्रवास

शहरातील मेट्रोच्या कामठी व पार्डी मार्गावरील मार्गिकांची कामे पूर्ण झाली आहे. तसेच समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. त्याच्या उद्घाटनाला पंतप्रधान येणार, असे यापूर्वी फडणवीस यांनीच जाहीर केले होते. पत्रकार परिषदेत त्यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, लवकरच या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. यासाठी त्यांची वेळ मागितली आहे. समृद्धीचे काही काम शिल्लक आहे. ते पूर्ण झाल्यावर तारीख जाहीर केली जाईल.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नागपूर : दसऱ्याला ८५ हजार जणांनी केला मेट्रोने प्रवास

संबंधित बातम्या

‘हॅलो, तुमच्यावर असलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीवर चर्चा सुरू आहे…’; खंडणीसाठी धवनकर कुलगुरू कक्षातून करायचे संपर्क
माझा फोन उचलत का नाही, असे विचारत एकतर्फी प्रेमातून गुंडाचा तरुणीवर…
बदल्यांवरून राज्यातील पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खदखद, कारणे कोणती?
आयुर्वेदाच्या नावावर समाज माध्यमांवर जीवघेणे सल्ले ; बांगला पान, लसूण, कापूर खा, आजार दूर करा!
भंडारा : वृध्द दाम्पत्याने दिला आज सायंकाळी आत्मदहन करण्याचा इशारा, पत्र मिळताच तहसीलदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“कश्मीर पंडितांच्या…” IFFI च्या ज्युरी प्रमुखांनी ‘द कश्मीर फाइल्स’चा ‘वल्गर’ उल्लेख केल्यानंतर चित्रपटातील अभिनेता संतप्त
पुण्यात १७०० चार्जिंग पाॅईंट
सचिन तेंडुलकरची लेक सारा करतेय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट? फोटो व्हायरल
पुणे: अल्पसंख्याक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेतून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वगळले
करोनामुळे मृत झालेल्या कर्जदारांची माहिती मागवली; सहकार विभागाला उशिरा जाग