बुलढाणा : शेतातील दैनंदिन कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याला पाईपातून फुस्स आवाज आला अन त्याची बोबडी वळली! भयभीत झालेल्या कास्तकाराने मग धावा केल्यावर घटनास्थळी आलेल्या ‘श्रीराम’ ने त्यांना संकटमुक्त केले…

बुलढाणा तालुक्यातील अंभोडा येथे हा मजेदार व तितकाच थरारक घटनाक्रम घडला. तेथील नारायण बाजीराव पवार हे शेतातील पाणी देण्याचे पाईप बदलण्यासाठी गेले. त्यांनी हाती धरलेल्या पाईपमधून फुस्स फुस्स असा आवाज आल्याने त्यांनी धोका ओळखला. भयभीत झाले असतानाही त्यांनी पाईप खाली टाकून त्याच्या दोन्ही बाजू कपड्याने बांधल्या.

हेही वाचा… ट्रक चालकासोबत प्राध्यापिकेने केला प्रेमविवाह, नंतर पती पडला भाजीविक्रेतीच्या प्रेमात; भरोसा सेलने…

हेही वाचा… ‘नेट’ परीक्षा ६ ते २२ डिसेंबरपर्यंत, यूजीसीची घोषणा; जाणून घ्‍या अर्जांची प्रक्रिया…

https://images.loksattaimg.com/2023/10/WhatsApp-Video-2023-10-03-at-12.19.33-PM.mp4

असा बाहेर काढला कोब्रा

दरम्यान याची माहिती देण्यात आल्यावर सर्पमित्र श्रीराम रसाळ घटनास्थळी आले. त्यांनी आवाजावरूनच पाईपमध्ये कोब्रा( नाग) असल्याचे ओळखले. पाईपच्या मधोमध असलेल्या नागराज ला बाहेर काढण्यासाठी त्यांनी शक्कल लढविली. विहिरीच्या पंपाला पाईप जोडल्यावर आलेल्या पाण्यातून चार फूट लांब नाग बाहेर पडला. त्याला शिताफीने बरणी बंद करून रसाळ यांनी ज्ञानगंगा अभयारण्यात सोडले.