मोदी-अदानी महाघोटाळ्याविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय झाल्याचे नमूद करीत प्रदेश काँग्रेस समितीने आंदोलनाचा राज्यव्यापी कार्यक्रम घोषित केला आहे. राययपुरातील महाधिवेशनात मोदी सरकारच्या उद्योगपतीधार्जिण्या धोरणामुळे अदानीचा महाघोटाळा उघड झाला असून जनतेचा पैसा सुरक्षित राहावा म्हणून आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याचे नमुद करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- चंद्रपूरमधील राजकीय समीकरणे कायम

या अंतर्गत सहा ते दहा मार्चदरम्यान राष्ट्रीयीकृत बँकांपुढे ब्लॉक स्तरावर आंदोलन होईल. १३ मार्चला सकाळी अकरा वाजता मुंबईत ‘चलो राजभवन’ मोर्चाचे आयोजन असून प्रत्येक जिल्ह्यातून अधिकाधिक कार्यकर्ते आणण्याच्या सूचना आहेत. पंधरा ते एकतीस मार्चदरम्यान जिल्हास्तरावर ‘पर्दाफाश रॅली’ काढण्याचे निर्देश आहे. या रॅलीत प्रदेश समितीने नेमून दिलेले निरीक्षक उपस्थित राहतील. एप्रिल महिन्यात राज्याच्या राजधानीत ‘पर्दाफाश महारॅली’ आयोजित होत आहे. त्यास राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते हजर राहतील. राज्यातील ज्येष्ठ नेत्यांसह सर्व लोकप्रतिनिधींना आंदोलनात सहभागी होण्याची सूचना आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statewide agitation of congress from 6th to 31st march pmd 64 dpj