चंद्रपूर : चंद्रपूर वनपरिक्षेत्रांतर्गत पायली-भटाळी गावाजवळ मंगळवारी सायंकाळी एका वृद्ध वाघिणीचा मृतदेह आढळून आला. मृत वाघिणी ही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील लोकप्रिय शर्मिली असल्याचा संशय वनपालांनी व्यक्त केला आहे. चंद्रपूर परिक्षेत्रातील वनपाल गेल्या काही दिवसांपासून पायली- भटाळी  गावांजवळ मादी वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याच पथकाला मंगळवारी संध्याकाळी गावाजवळील कंपार्टमेंट क्रमांक ८८१ मध्ये वाघिणीचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच वनाधिकारी राहुल कारेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. चंद्रपूरमधील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरकडे (टीटीसी) चौकशीच्या प्रक्रियेनंतर मृत वाघिणीचे सर्व अवयव शाबूत असल्याचा दावा करून घातपाताची शक्यता नाकारण्यात आली आहे. वृद्धापकाळामुळे तिचा मृत्यू झाल्याचा संशय आहे, परंतु नेमके कारण शवविच्छेदनानंतर निश्चित केले जाईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The body of a tigress was found in a forest near the chandrapur range rsj 74 ysh