अकोला : कपड्यांना लावण्यात येणारा चिमटा नाकाला लावल्याने जीव गुदमरून साडेचार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील बलोदे लेआऊटमध्ये घडली. शहरातील कौलखेडमधील हिंगणा मार्गावरील बलोदे लेआउटमधील रहिवासी रवींद्र आमले यांची साडेपाच वर्षीय चिमुकली घरात खेळत होती. मुलीची आई घरकाम करीत असताना मुलीने घरात कपड्यांना लावण्यात येणारा चिमटा नाकाला लावला.
चिमटा काढता न आल्यामुळे तिचा श्वास कोंडला गेला आणि यातच तिचा मृत्यू झाला. ती घरात पडलेली दिसल्यावर मुलीच्या आईने तिला रुग्णालयात उपचारासाठी नेले, परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणात खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंद केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुलीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल आल्यावरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. चिमुकलीच्या मृत्युवर संशय व्यक्त होत आहे.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The nose was block and the child died of suffocation ppd 88 ysh