नागपूर : नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पालगत असलेल्या भजेपार/गोंडीटोला परिसरात खवले मांजराची शिकार करण्यात आली. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून आरोपी शिवकुमार कोडवते, मनोहर मसराम, राकेश कोडवते यांना अटक केली. यावेळी सर्व आरोपी त्यांच्या घरात खवले मांजराचे मटण कापत होते. त्यांच्याकडून खवले मांजराचे कापलेले अवयव, कापण्यासाठी वापरण्यात आलेली अवजारे, कुऱ्हाड, विळा, खवले मांजराचे कापलेले मांस, खवले, आतडी हे सर्व जप्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “घाबरट सरकार कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहे”, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

हेही वाचा – चंद्रपूर : आमदार प्रतिभा धानोरकरांचा इशारा, कृषिपंपांना २४ तास थ्री फेज वीजपुरवठा न केल्यास…

वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई वनरक्षक शिवराज पिसाळ, धनंजय कोकाटे, स्वप्नील पायघान, सुनील भालेराव, सागर भेलावे, प्रणय वालदे, महेश रहांगडाले यांनी केली. पुढील कार्यवाहीसाठी वनपरिक्षेत्र तिरोडा यांना हे प्रकरण सोपवण्यात आले. आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास भारतीय वनसेवेतील वनपरिक्षेत्र अधिकारी योगेंद्र सिंह (परिविक्षाधीन), वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक व कर्मचारी करीत आहेत. या कारवाईत भंडारा येथील पर्यावरण संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे मोलाचे सहकार्य मिळाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The villagers hunted pangolin but got caught rgc 76 ssb