चंद्रपूर : मूल तालुक्यातील आणि सावली वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येत असलेल्या राजोली बिटातील डोंगरगाव शेत शिवारात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला. ही घटना आज सकाळी डोंगरगाव येथे उघडकीस आली. बछडयाला सापाने चावा घेतला असावा, असे वन कर्मचाऱ्याने सांगितले. धानाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतमालकाला त्याच्या शेतात बछडा मृतावस्थेत आढळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सविस्तर वाचा…दर्जेदार कामे केली नाही, तर खबरदार, काय म्हणाले गडकरी….

त्याने तात्काळ राजोली बिटाला माहिती दिली.वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सापाने चावले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बछडा १५ महिन्यांचा आहे. वाघिणीपासून तो भरकटला असावा ,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी भेट दिली. सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि राजोली बीटाचे वनरक्षक सुरेंद्र वाकडोत यांनी पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर बछडयाला चंद्रपूर येथे नेण्यात येणार आहे.