लोकसत्ता टीम
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
वर्धा: पौगंडावस्थेतील तारुण्यात प्रेमांकुर बहरण्यास वेळ लागत नाही. मात्र अधिक मजल गाठली की हे कोवळे वय कोमेजायला वेळ पण लागत नाही. अशाच वयातील एका कन्येचे प्रेम नात्यातीलच एका मुलाशी जुळले. पण हे प्रेम भलतेच बहरले. पीडित कन्येचा अबोधपणाचा फायदा घेत ठिकठिकाणीच नव्हे तर प्रेमविराने तिच्या घरीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दरम्यान पीडिता गर्भवती राहिली. कुटुंबीयांनी तिला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. बाळाचा जन्म झाल्यावर ही धक्कादायक बाब उजेडात आली. तक्रार झाल्यावर सिंदी पोलीसांनी अल्पवयीन प्रियकरास ताब्यात घेतले आहे. सींदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावातील ही घटना आहे. गावात सर्वत्र याची चर्चा सुरू आहे.
First published on: 26-04-2023 at 13:56 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Underage lover detained as mother of minor child pmd 64 mrj