चंद्रपूर : उद्या बुधवार १ मार्च २०२३ रोजी सुर्यास्तानंतर पश्चिम आकाशात अतिशय विलोभनीय आणि दुर्मिळ अशी गुरू आणि शुक्र ग्रहांची युती पहावयास मिळणार आहे. ही अशी युती १५ वर्षानंतर दिसत असून पुन्हा पाहण्यासाठी १५ वर्षांची वाट पहावी लागणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या गुरू आणि शुक्र हे मिन राशीत असून ते गेल्या आठवड्यापासून जवळ येत होते. १ ते ५ मार्च पर्यंत ही युती जवळ राहणार असली तरी सर्वाधिक जवळ उद्या बुधवार १ मार्चला राहणार आहे. आकाशात सर्वाधिक तेजस्वी असे दोन ग्रह एक डिग्री पेक्षा कमी अंतरावर येण्याची आणि पाहण्यासाठी ही दुर्मिळ संधी आहे. ही युती (Conjunction) भासमान युती आहे.

हेही वाचा >>> अहीरांच्या पराभवाला मुनगंटीवार तर माझ्या पराभवाला…, माजी खासदार चंद्रकात खैरेंचा थेट आरोप

जरी हे दोन ग्रह जवळ दिसत असले तरी पृथ्वी पासून त्यांचे अंतर खुप जास्त आहे. उद्या शुक्र पृथ्वीपासुन २० ,५६,३१,१४१ कोटी किमी तर गुरू ८६,१८,४३,१९२ कोटी किमी अंतरावर असतील. १ मार्चला दोघांतील अंतर एक डिग्रीच्या कमी म्हणजे ३९ आर्कमीटर अंतरावर असेल तर २ मार्चला ४५ आर्कमीटर अंतरावर असेल. ह्या दरम्यान शुक्राची तेजस्विता -४.२ तर गुरुची तेजस्विता -२ ० असेल. ३,४,५ मार्च पर्यंतसुद्धा ते १ ते २ डिग्री इतक्याकमी अंतरावर असतील.पुढे गुरू ग्रह सूर्याकडे गेलेला दिसेल तर शुक्र आकाशात वर येताना दिसेल. महाराष्ट्रातील सर्व खगोलप्रेमी विध्यार्थी आणि नागरिकांनी ही दुर्मिळ युती पाहण्याची संधी सोडू नये. चंद्रपुर येथे उद्या बुधवार १ मार्च २०२३ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख शाळा, वडगाव, आंबेडकर सभागृहाजवळ,चंद्रपुर येथे संध्याकाळी सुर्यास्तानंतर लगेच (६.०० ते ८.००) वाजेदरम्यान गुरू, शुक्र युती अवकाश निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व खगोलप्रेमींनी ह्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्काय वॉच गृप तर्फे करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venus and jupiter planet meeting in sky after 15 year rsj 74 zws