नागपूर : अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारीला होत आहे. या सोहळ्याचे निमंत्रण सर्व सामान्यांना देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे विदर्भात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. १ ते १५ जानेवारी या काळात विदर्भातील १० हजार गावांमध्ये १५ लाखांवर घरांमध्ये विहिंप कार्यकर्ते प्रभू श्रीरामाचा फोटो आणि एक आव्हान करणारे पत्रक नागरिकांना देणार आहे, अशी माहिती विहिंपचे मुंबई-गोवा विभागाचे प्रमुख गोविंद शेंडे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

५ नोव्हेंबरला देशभरातील २०० कार्यकर्त्यांना अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील अक्षता व प्रभू श्रीरामाचे छायाचित्र व माहिती पत्रक दिली जाणार आहेत. या अक्षता आणण्यासाठी महाराष्ट्रातून १० कार्यकर्ते जाणार आहे. त्यात विदर्भातून विदर्भ प्रांत मंत्री अमोल अंधारे आणि राम लोखंडे या दोन कार्यकर्त्यांचा समावेश आहे. २७ नोव्हेंबरला नागपुरात या अक्षता आल्यावर पोद्दारेश्वर मंदिरात पूजा होईल. त्यानंतर विदर्भातील विविध जिल्ह्यात या अक्षतांचे घराघरात वाटप केले जाणार असल्याचे शेंडे यांनी सांगितले.

हेही वाचा : आमदार प्रतिभा धानोरकर संतापल्या… वीज कार्यालयाला ठोकले कुलूप; कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना खोलीत कोंडले

ज्यांना अयोध्येतील मंदिराच्या लोकार्पणाला जाणे शक्य नाही, त्यांनी आपल्या गावातील मंदिरात प्राण प्रतिष्ठापना सोहळा साजरा करावा. ‘माझा परिसर, माझे गाव, माझी अयोध्या’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यानुसार २२ जानेवारीला सकाळी ११ वाजेपर्यंत गावागावात ध्वज उभारायचे, मंदिरासमोर रांगोळ्या आणि नामस्मरण पूजा पाठ आदी धार्मिक कार्यक्रम करायचे आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा गावागावात दाखवण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishwa hindu parishad vhp set goal to give invitation to 15 lakh households in vidarbh for the opening ceremony of sri ram temple ayodhya vmb 67 css