नागपूर : एअर इंडियाचे अहमदाबाद-लंडन या विमानाला भीषण अपघात झाला आणि त्यात प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, पण या अपघातून चत्मकारिकरित्या एक प्रवासी बचावला. हा प्रवासी विमानातील सीट क्रमांक ११ए वर बसला होता. हे कळताच विमानाने प्रवास करू इच्छणारे प्रवासी या सीटला प्राधान्य देत आहे. त्यामुळे अचानक तिकीट बुकिंग करणाऱ्या एजन्सीकडे विचारणा केली जात असल्याची माहिती आहे.

या भीषण अपघातामधून भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक विश्वासकुमार रमेश हे सुखरुप बचावले. जखमी अवस्थेत चालत जात असलेला त्यांचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. विमानातील २४२ लोकांपैकी ते एकमात्र वाचू शकले. पण हा चमत्कार कसा घडला? विश्वासकुमार विमानाच्या बाहेर कसे पडले? याबाबत त्यांनीच माहिती दिली आहे. डीडी न्यूजशी बोलताना आणि अपघातानंतर डॉक्टारांना दिलेल्या माहितीवरून काही बाबी समोर आल्या आहेत.

खुर्चीसकट बाहेर फेकले गेले

विमानाच्या उड्डाणानंतर काही सेकंदातच अपघात घडला. विमानात ते सीट क्रमांक ११ ए वर बसले होते. विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकले व जेथून विमानाचा एक भाग तुटला, तिथेच ११ए ही सीट क्र ११ होती. त्यांच्या सीटजवळच एक्झिट डोअर होते. त्यातून ते वेळीच बाहेर पडले. त्यानंतर विमानाचा स्फोट झाला. त्यामुळे ते बचावले.

काय म्हणाले विश्वासकुमार रमेश

मी विमानातून उडी मारली नव्हती. तर माझ्या सीटसह मी फेकला गेलो. “मी जिथे पडलो, ती जागा सपाट होती.”, अशी माहिती विश्वासकुमार यांनी डीडी न्यूजशी बोलताना दिली. “विमान उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच अपघात घडला. विमान वसतिगृहाच्या इमारतीला जाऊन आदळले होते. मी जिथे बसलो होतो, तो भाग आधीच जमिनीवर पडला. माझ्या बाजूला एक्झिट डोअर होता, त्यामुळे मी तिथून बाहेर पडलो. पण माझ्या विरुद्ध बाजूला एक भिंत असल्यामुळे तिथल्या लोकांना विमानातून बाहेर पडणे शक्य झाले नसावे. मी बाहेर पडल्यानंतर विमानाचा स्फोट झाला, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक

विश्वासकुमार रमेश हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत. ते ३९ वर्षांचे आहे. ते आपल्या भावासह दीव येथे आले होते. अहमदाबादहून ते आपल्या भावासोबत परत निघाले होते. एअर इंडियाच्या एआय१७१ या विमानात ११ए या सीटवर ते बसले होते. त्यांचा भाऊ मात्र अपघातात वाचू शकला नाही. गेल्या २० वर्षांपासून रमेश हे लंडनमध्ये त्यांच्या कुटुंबासमवेत राहत आहेत.