वाशिम : वाशिम शहरात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली. कुटुंबातील सदस्य हळदीच्या कार्यक्रमाला गेले असता, जवळच राहणाऱ्या गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती विजय उर्फ भोला बरखम याने ८ वर्षीय चिमुरडीवर जिवाने मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला. यातील सहआरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी आज महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाशिम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील पंचशील नगर येथे १ मे रोजी हळदीचा कार्यक्रम होता. त्यामुळे घरातील सदस्य कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी ८ वर्षीय चिमुरडी घरी एकटीच होती. हे बघून तुझ्या पप्पानी तुला बोलाविले म्हणून स्वतःच्या घरी नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला. व कुणाला काही सांगितले तर जिवाने मारून टाकीन अशी धमकी दिली. अशी फिर्याद २ मे रोजी पोलीस ठाण्यात दिली.

हेही वाचा – ॲड. प्रकाश आंबेडकरांचे राजकारण जनतेने ओळखले; काँग्रेस पाडण्यासाठीच… डॉ. अभय पाटील यांची टीका

आरोपीला अटक केली असली तरी इतर सह आरोपी मोकाट असून त्यांनाही अटक करावी. या प्रकरणाचा तपास भक्कमपणे करून दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वज्रदेही महिला विकास संघाच्या अध्यक्ष आरती ठोके यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांच्या उपस्थितीत मोर्चा काढून केली. यावेळी महिलांची मोठी उपस्थिती होती.

हेही वाचा – चालकाला डुलकी लागली अन ‘समृद्धी’वर बस उलटली

गत काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. वाशिम शहरातदेखील यापूर्वी बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा शहरात ८ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडली असून पोलिसांनी कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Washim abuse of 8 year old girl who was alone at home vajradehi mahila vikas sangh march pbk 85 ssb