यवतमाळ : जगाच्या पोशिंद्याला जीवनयात्रा संपवावी लागणे, हे खरोखरच दुर्देवी आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाचून वाईट वाटते. माझी आई विदर्भातील अकोल्याची असल्याने या भागाशी विशेष जिव्हाळा आहे. आजोबा शेती करायचे. मात्र, शेतकऱ्यांचे जगणे प्रत्यक्ष बघता आले नाही. संधी मिळाल्यास शेतकऱ्यांचे जगणे अभिनयातून मांडायला आवडेल. तसेच प्रत्यक्षात शेतकरी जोडीदार आयुष्यात आल्यास आवडेल, असे मत प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री सायली संजीव हिने व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आज गुरुवारी ‘विंग्ज २०२४’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आली असता, सायली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होती. यवतमाळात अभियांत्रिकीचे दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मेट्रो सिटीत जावे लागत नाही, ही जमेची बाजू आहे. सायली हिने मालिका, चित्रपट व नाटकात काम केले आहे. काहे दिया परदेस या मालिकेला रसिकांनी डोक्यावर घेतले. एसबी आणि सीडी, झिम्मा, ओले ओले या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत. आपला अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतोय, हे बघून मनस्वी आनंद होत असल्याचे सयाली म्हणाली.

हेही वाचा – मंत्री गुलाबराव पाटील भर सभेत म्हणाले, ‘आय लव यु…’

हेही वाचा – अवकाळी पाऊस पुन्हा परतला, ‘या’ शहरात मोठे नुकसान…

मराठी चित्रपटात कलाकार खरोखरच प्रामाणिकपणे जीव ओतून अभिनय करतात. रसिकही आता समजूतदार झाले आहे. त्यामुळे कलाकारांची जबाबदारी अधिक वाढली आहे. नाटक व चित्रपट वेगळे विषय आहेत. चित्रपट बनवताना प्रेक्षकांना काय आवडते, याचा विचार सर्वप्रथम डोक्यात ठेवावा लागतो. लंडनमध्ये चित्रपटांना अनुदान लवकर मिळते. त्यामुळे निर्माते आर्थिक दृष्ट्या तरले जात असल्याने शुटींगसाठी पसंती देत असल्याचे स्पष्ट केले. रिअल आयुष्यात शेतकरी जोडीदार मिळाल्यास त्यालाही आपली पसंती राहणार असल्याचेही सायलीने सांगितले. यावेळी जगदंबा अभियांत्रिकीचे सचिव, डॉ. शीतल वातीले आदी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What actress sayali sanjeev says about farmer in yavatmal nrp 78 ssb
First published on: 15-02-2024 at 20:28 IST