आधार ओळखपत्र ही आज काळाची गरज बनली आहे. हे ओळखून नागपूर जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी रुग्णालयात बाळाचा जन्म होताच त्याचे आधार कार्ड (आधार ॲट बर्थ ) काढणे आता बंधनकारक राहणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यासंदर्भातील निर्देश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘ग्रामहित’च्या कष्टाचा ‘ग्लोबल’ गौरव! ‘फोर्ब्स’च्या मुखपृष्ठावर झळकली यवतमाळची तरुणी

रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या प्रत्येक बालकाच्या आधारची प्रक्रिया पोस्ट विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने पूर्ण केल्या जाईल व रुग्णालयात जन्मलेले एकही नवजात बालक आधार प्रक्रियेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची संबंधित यादीतील रुग्णालयांच्या प्रमुखांनी आणि टपाल कर्मचा-यांनी दक्षता घ्यावी. तसेच रुग्णालय प्रमुखांनी या कामाचा मासिक अहवाल दरमहा जिल्हाधिकारी कार्यालयास तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, नागपूर व जिल्हा आरोग्य अधिकारी, नागपूर यांना सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is aadhaar at birth aadhar card will be given after the birth of the child dpj