नागपूर : लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात टीबी झाल्यामुळे पतीच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. तो एचआयव्हीग्रस्त असल्याचे निदान झाले. तरीही महिलेने दोघांच्याही आरोग्याची काळजी घेऊन संसार थाटला. मात्र, आठ वर्षांनंतर तो समलैंगिक असल्याचे कळल्यानंतर पत्नीने घटस्फोटासाठी धाव घेतली. मात्र, भरोसा सेलने दोघांचेही समूपदेशन करीत पुन्हा नव्याने संसार जुळवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजयचे (४०, सीताबर्डी) वडिलोपार्जित ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीचे दुकान आहे. वडिलांचा व्यवसाय सांभाळणाऱ्या संजयचे २०१३ मध्ये सविता (३०. दोघांचेही काल्पनिक नाव) हिच्याशी लग्न झाले. दोघांचाही सुखी संसार सुरु झाला. मात्र, संसाराला दृष्ट लागली आणि मोठे संकट कोसळले. संजयला टीबी झाली आणि रक्तचाचणी करण्यात आली. त्यात संजयला एचआयव्हीची बाधा झाल्याचे निदान झाले.

हेही वाचा – वर्धा : कोण होणार हिंदी विद्यापीठाचे नवे कुलगुरू?

नवविवाहित सविताच्या पायाखालची जमीन सरकली. सवितानेही रक्तचाचणी केली. मात्र, तिला सुदैवाने बाधा झाली नव्हती. संजय आणि सविता यांच्याकडील कुटुंबियांनी बैठक घेतली. मात्र, या बिकट परिस्थितीत सविताने लहान बहीण आणि विधवा आईची खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता पतीची बाजू घेतली आणि संसार थाटण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती काळजी घेत संसार सुरु केला. संसारात केव्हाच एचआयव्हीची बाधा याबाबत कोणतीही दोषारोप किंवा वाद घालण्यात येत नव्हता.

वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घेत तंत्रज्ञानाच्या मदतीने सविताने एका मुलीला जन्म दिला. सध्या मुलगी ८ वर्षांची असून कुटुंबात आनंदी वातावरण होते. संजय हा नेहमीप्रमाणे दुकानात बसत होता तर सविता मुलगी आणि घर सांभाळून पतीला मदत करीत होती.

हेही वाचा – चंद्रपूर: जिल्हा बँकेच्या बडतर्फ कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, ‘सुसाईड नोट’मध्ये अनेकांची नावे

गेल्या ऑक्टोबर महिन्यात संजयचा मोबाईल पत्नी सविताने बघितला. त्यात संजयच्या मोबाईलमध्ये स्वतःचे काही अश्लील छायाचित्र आढळले. तसेच काही चित्रफितींमध्ये स्वतः संजय वेगवेगळ्या युवकांशी संबंध ठेवताना दिसत होता. संतापलेल्या सविताने पतीला विचारणा केली असता त्याने समलैंगिक असल्याचे मान्य केले. हा प्रकार सहन न झाल्याने सविताने थेट घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्याने भाऊ आणि बहिणीशी चर्चा केल्यानंतर त्यांनी संपत्तीतील एक पैसाही न देता घटस्फोट देण्याचा उलटा सल्ला दिला.

मुलीच्या पालनपोषणासाठी आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी सविताने पोलिसांत तक्रार केली. भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांनी तक्रार समजून घेतली. पती-पत्नीला समूदेशक प्रेमलता पाटील यांनी बोलावले. त्याने भाऊ आणि बहिणीला मदतीसाठी फोन केला. मात्र, त्यांनी अपशब्द बोलून मदत करण्यास नकार दिला. भाऊ आणि बहिणीने वाऱ्यावर सोडल्यामुळे संजय खचला. संजयचे डोळे उघडले सर्व काही सोडून पत्नी सविताशी पुन्हा नव्याने संसार थाटण्याची गळ घातली. भरोसा सेलने त्या दोघांचेही समूपदेशन करीत घरी पाठवले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife seeks divorce after finding out hiv positive husband is homosexual counseling done by bharosa cell adk 83 ssb