वर्धा: छोट्या-मोठ्या चोऱ्या करीत पोलीसांना गुंगारा देण्यात तिघीही पटाईत. किरकोळ गुन्हा म्हणून पटकन सुटायच्या पण. यावेळी मात्र त्यांनी कार्यक्षेत्र वाढविले. आता एका महिला उद्योजकाकडे त्यांनी हातसफाई दाखविली. पोलीस अचंबित. मात्र अशा चोऱ्या तर त्या तिघीच करतात, आता शहराबाहेर पण का? अशी शंका आली. एकीला पकडले तेव्हा ‘ संगीता, आरती, लक्ष्मी ‘ गुन्हा कबूल करून मोकळ्या झाल्या. पोलीस दफ्तरी या तिघींची नोंद सराईत चोर म्हणून झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धेत हात मारणाऱ्या तिघींनीही यावेळी ग्रामीण भागात म्हणजे समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळद्या येथे स्वारी केली. हळद उद्योग चालविणाऱ्या ज्योती पाटील यांच्या प्रकल्पात घुसखोरी करीत त्यांनी बॉयलर, कोईल, मोटार पंप, बॉडी कव्हर व अन्य साहित्य लंपास केले. अंदाज घेत समुद्रपूर पोलीसांनी वर्धेलगत बोरगाव येथे राहणाऱ्या संगीताच्या घराची तपासणी केली. तेव्हा तिने शेजारीच राहणाऱ्या आरती व लक्ष्मीच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली देऊन टाकली. चाळीस हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करीत महिला पोलीसांनी तिघींनीही जेरबंद केले.काही जप्त व्हायचा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women theft robbery crime arrested police pmd 64 ysh