वर्धा : अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा थंड पेयं पिण्यास भाग पाडतो. पावले आईस्क्रीम पार्लरकडे धाव घेतात. पण खात्रीचे असेल तर बरे अन्यथा भलतेच व्हायचे. येथील स्टेशन फैल भागात राहणारे कुणाल पाली हे मुलांच्या आग्रहास्तव एका आईस्क्रीम दुकानात पोहचले. तीन फ्रूट सॅलेड घेवून घरी आले.

हेही वाचा >>> “सत्तास्थापनेच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाची न्यायिक चूक”, ॲड. असीम सरोदे यांचे परखड मत, म्हणाले…

खाणे सुरू केले असतानाच मुलाच्या सॅलेड कपात किडा आढळून आला. ते पाहून मुलाला उलटी झाली. लगेच त्यांनी दुकानात धाव घेत जाब विचारला. पण दुकानदार हा कप आपल्या दुकानातील असल्याचे मान्य करायला तयारच नव्हता. मात्र पाली यांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासण्याचा आग्रह धरला. तेव्हा पाली तीन सॅलेड कप विकत घेत असल्याचे दिसून आले. यानंतर दुकानदाराने चूक मान्य केली. मात्र धास्तावलेल्या पाली यांनी दुकानदारास जरब बसावी म्हणून थेट अन्न व औषधी प्रशासन कार्यालय गाठले. तिथे तक्रार करीत त्या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.