जळगाव – दिवाळीनिमित्त सुटी असतानाही कार्यालयात येत पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या सहायक गटविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकाऱ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोघा  अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र सपकाळे (५४) असे लाचखोर सहायक ग्रामविकास अधिकाऱ्याचे, तर पद्माकर अहिरे (५३) असे विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जामनेर तालुक्यातील एका लोकसेवकाच्या विरोधात चौकशी सुरू होती. सहायक ग्रामविकास अधिकारी रवींद्र सपकाळे आणि विस्तार अधिकारी पद्माकर अहिरे यांच्याकडून चौकशी करण्यात येणार होती. तुम्हाला चौकशीतून दोषमुक्त करतो, तुमचा अहवाल चांगला पाठवितो, त्यासाठी आम्हाला पाच लाख रुपये लागतील, असे अधिकाऱ्यांनी तक्रारदारास सांगितले.  चौकशी अहवाल अनुकूल देण्याच्या मोबदल्यात सात नोव्हेंबरला दोन्ही अधिकाऱ्यांनी पाच लाख रुपये मागितले. लाच देण्याचे निश्चित झाले. संबंधित तक्रारदाराने याबाबत  जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्याअनुषंगाने पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांनी तक्रारीच्या पडताळणीसाठी पथक नियुक्त केले. दिवाळीची सुटी असूनही पंचायत समिती कार्यालयात लाच स्वीकारण्यासाठी सहायक गटविकास अधिकारी सपकाळे, विस्तार अधिकारी अहिरे हे गेले होते. लाचेपोटी पाच लाख रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti corruption department team of extension officer arrested an assistant group development officer who accepted a bribe amy