नाशिक – कळवण-देवळा रस्त्यावर एसटी बस प्रथम रस्त्यालगतच्या खांबाला व नंतर झाडाला धडकून झालेल्या विचित्र अपघातात १७ जण जखमी झाले. गुरुवारी रात्री हा अपघात झाला. जखमींपैकी दोघांना गंभीर दुखापत झाली असून अन्य प्रवासी किरकोळ जखमी असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपघातग्रस्त बस कळवण आगाराची होती. कळवण-मालेगाव मार्गावरून ती रात्री निघाली होती. देवळा शहरातील नर्मदा मोती कॉम्प्लेक्ससमोर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. भरधाव बस प्रथम खांबाला धडकली. नंतर ती चिंचेच्या झाडाला धडकली. या अपघातात बसची वाहक बाजू पूर्णपणे दाबली गेली.

वाहक वाय. एस. महाले यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. पत्रा दबल्याने चालकाचे आसनही अडकले. दोन जण गंभीर जखमी झाले. इतर १३ प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

हेही वाचा : रायगडात रस्ते अपघातांच्या संख्येत घट, अपघाती मृत्यू संख्येत मात्र वाढ

बसमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना बाहेर काढून तातडीने शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. बसमध्ये एकूण १८ प्रवासी होते. चालक व वाहक मिळून १७ जण जखमी झाल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus accident on kalvan devala road in nashik many injured pbs