जळगाव : एकनाथ खडसेंचा जावई दोन-अडीच वर्षांपासून तुरुंगात आहे. त्यांना जामीन मिळत नाही. ते सुटत नाहीत. या माणसाच्या स्वार्थामुळे विनाकारण जावयास तुरुंगात बसावे लागले आहे, असा आरोप ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाजन यांनी माझ्यामागे ईडी लावली म्हणून त्यांच्यामागे मोक्का लागला, असा आरोप खडसेंनी केला होता. भुसावळ येथे एका उद्घाटन सोहळ्याला मंत्री महाजन यांची उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खडसे यांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खडसे यांचे डोके तपासायला लागणार आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सतत ईडी, मोक्का लावला, हे लावले, ते लावले, असे म्हणत असतात.

मी तर खडसेंवर कुठलेही आरोप केलेले नाहीत, जे आरोप केले आहेत, ते अंजली दमानिया यांनी केले आहेत. त्या त्यांच्याविरुद्ध न्यायालयात गेल्या होत्या. त्यामुळे सर्व गोष्टी समोर आल्या. त्यासंदर्भात जी चौकशी झाली होती, त्या चौकशीअंती सर्व सिद्ध झाले आहे. जिल्हा दूध संघाच्या चोरीचे प्रकरण पुढे आले आहे. त्याचे सर्व पुरावे आहेत. मला जास्त बोलायला लावू नका. मी जर तोंड उघडले तर लोक तुमच्या तोंडाला काळे फासतील, असा इशाराही महाजन यांनी दिला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse selfishness son in law is in jail girish mahajan allegation ysh