नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात पूर्वीच्या भांडणाची कुरापत काढत कैद्यांमध्ये हाणामारी झाली. दोघांनी एका कैद्याच्या डोक्यात आणि डोळ्याजवळ फरशीच्या तुकड्याने हल्ला करुन जखमी केले. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैदी अमीर शमीर खान उर्फ मुर्गीराजा (३७) हा काही दिवसांपासून आजारी आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी सर्कल क्रमांक सातच्या फाटक बाहेरून तो निघाला असता कारागृहातील खाद्यागृहाबाहेर पूर्वीच्या भांडणातून हुसेन फिरोज शेख आणि तेजस गांगुर्डे यांनी अमीरवर पाठीमागून फरशीच्या तुकड्याने हल्ला केला. डोक्यात आणि डोळ्याजवळ घाव बसल्याने अमीर जखमी झाला. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनाची धावपळ उडाली. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published on: 28-02-2023 at 22:20 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inmate injured in scuffle at nashik road central jail zws