Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

नाशिक न्यूज

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला नाशिक (Nashik) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर मिळतील. नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील आणि भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक शहर आहे. देशात सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरामध्ये मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे, तर पश्चिमेस त्र्यंबकेश्वर आहे. पंचवटी हादेखील नाशिक शहराचा एक भाग आहे. पौराणिक संदर्भांनुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


नाशिक शहराच्या नावामागे दोन कथा प्रसिद्ध आहेत. एका कथेचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले आहे. दुसऱ्या मान्यतेनुसार नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे.

आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून, ते भारतातील वेगाने विकसित असलेल्या शहरांपैकी एक आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता


Read More
Boy drowned during Ganesh Virsajan in Nandurbar
नंदुरबारमध्ये गणेश विर्सजन करताना मुलाचा बुडून मृत्यू

नंदुरबार जिल्हा रुग्णालयासमोरील तळ्यात गणपती विसर्जन करताना अचानक पाण्याने भरलेल्या चारीचा कडा तुटल्याने १५ वर्षाच्या मुलाचा कोसळल्याने बुडून मृत्यू झाला.

Thackeray group alleges that police are ready to implicate Deepak Badgujar in Ambad firing case
अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप

अंबड येथे अडीच वर्षांपूर्वी रिपाइं (आठवले गट) पदाधिकाऱ्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासणीत पोलीस शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा…

Rumors of army recruitment upset youths crowds in Devalali
सैन्य भरतीच्या अफवेने तरुणांना मनस्ताप, देवळालीत गर्दी

समाज माध्यमात आलेल्या सैन्य भरतीच्या पत्रावर विश्वास ठेवून देवळाली कॅम्प येथे आलेल्या युवकांना शनिवारी मनस्ताप सहन करावा लागला.

Questions to Girish Mahajan in Jamner taluka due to bad condition of the roads
रस्त्यांच्या अवस्थेवरुन जामनेर तालुक्यात गिरीश महाजनांवर प्रश्नांची सरबत्ती

गावातील रस्ते कधी सुधारणार, यांसह इतर समस्यांसंदर्भात अनेक प्रश्न जळगावच्या जामनेर तालुक्यातील लिहा तांडा गावातील तरुणांनी उपस्थित केल्याने ग्रामविकास मंत्री…

Onion price increased by Rs 400 quintal rate to Rs 4600
कांदा दरात ४०० रुपयांनी वाढ, क्विंटलचे दर ४६०० रुपयांवर

शनिवारी लासलगाव बाजार समितीत पाच हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यास किमान ३७००, कमाल ४७०० आणि सरासरी ४६०० रुपये दर…

Thieves challenge forest department cut sandalwood tree in chief conservators bungalow
चोरांचे वन विभागाला आव्हान, मुख्य वनसंरक्षकांच्या बंगल्यातील चंदन वृक्षतोड

शहरातील त्र्यंबक रस्त्यावरील मुख्य वनसंरक्षकांच्या बंगल्याच्या आवारातून चार चंदनाची झाडे कापून चोरून नेण्यात आली

House collapse in dangerous Kazigadi area along Godavari in Nashik nashik
नाशिकमध्ये धोकादायक काझीगढीत घरांची पडझड; सुमारे १०० रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

जुने नाशिकमधील गोदावरी काठालगतच्या धोकादायक काझीगढी भागात शनिवारी दुपारी पावसामुळे माती ढासळून काही घरांची पडझड झाल्यामुळे या भागातील असुरक्षिततेचे सावट…

Nashik Municipal Corporation made a natural Ganesh immersion site for Ganesh immersion 2024
गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव

गणरायाला पर्यावरणस्नेही पध्दतीने निरोप देण्यासाठी महानगरपालिकेने विसर्जनासाठी २९ नैसर्गिक गणेश विसर्जन स्थळ तर ५६ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे.

Laborers working under Mahatma Gandhi Rojgar Guarantee Yojana are in arrears of wages since two months
रोहयोतील कामाच्या मजुरीची दोन महिन्यांपासून प्रतिक्षा; केंद्रासह राज्य सरकारकडे रक्कम थकीत

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात लाडक्या बहिणीसह विविध योजनांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणारे राज्यातील…

नाशिक शहरातील खड्डे दुरुस्तीची मनपा आयुक्तांकडून पाहणी
नाशिक शहरातील खड्डे दुरुस्तीची मनपा आयुक्तांकडून पाहणी

नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्वच राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेत या स्थितीला महापालिकेला जबाबदार धरले असताना…

संबंधित बातम्या