नाशिक – येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या २०२३-२४ या वर्षातील उन्हाळी सत्र लेखी परीक्षा २४ मे ते १२ जून या कालावधीत विद्यापीठाच्या ६०१ केंद्रांवर होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर प्रवेश घेतलेले सुमारे चार लाख ८९ हजार ६६० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा सुरळीत होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा आयोजनाच्या सर्व मार्गदर्शन सूचना विभागीय केंद्रांमार्फत अभ्यास केंद्रांना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांसाठी मदत यंत्रणाही कार्यरत करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले असून, विद्यार्थ्यांनी ते पोर्टलवरून डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा – नंदुरबार : शाळेजवळ दारु दुकान सुरु करण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्याकडून लाच

हेही वाचा – व्यापारी मार्ग उभारणीनंतर कृषिमाल पुरविण्यात महाराष्ट्राची भूमिका महत्वपूर्ण, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरी, व्यवसाय, पोलीस, सैनिक, गृहिणी, शिक्षक इत्यादी विविध घटकांतील आहेत. विविध ११५ शिक्षणक्रमांच्या विविध विषय मिळून तब्बल तीस लाखांहून अधिक उत्तरपत्रिका लिहिल्या जाणार आहेत. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार विद्यापीठाच्या परीक्षा सुरु होत असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक यांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik open university examination from 24 may ssb