सोलापूर येथील आडत व्यापाऱ्यांनी जिल्ह्यातील रुनमळी (ता.साक्री) येथील कांदे उत्पादकाला दोन लाख, ३३ हजार रुपयांना फसविले. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नाशिक : जिल्हा परिषदेचे कामकाज कागदविरहित होण्याच्या दिशेने पाऊल

राजकुमार माशाळकर आणि नारायण माशाळकर अशी संशयित कांदे व्यापाऱ्यांची नावे आहेत. या संदर्भात सचिन पवार ( ३२, रुनमळी, साक्री) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रुनमळी शिवारात पवार यांची शेती आहे. पाच सप्टेंबर २०२२ च्या रात्री व्यापाऱ्यांनी पवार यांच्याकडून कांद्याच्या ५५३ गोण्या नेल्या.परंतु, संबंधित आडत व्यापाऱ्यांनी कांदा विक्रीचा खर्च वजा करून पवार यांना दोन लाख, ३३ हजार ८९५ रुपये दिलेच नाहीत. उलट पवार यांना शिवीगाळ करून धमकी दिली. व्यापारी राजकुमार आणि नारायण माशाळकर यांचे सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डमधील गाळा क्रमांक १५२ मध्ये दुकान आहे. या ठिकाणी त्यांचा कांद्याचा व्यवसाय चालतो, अशी।माहिती पवार यांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion farmer cheated for two lakh rupees by traders zws