नवरात्रोत्सवातील शनिवारी सातवी माळ असल्याने सप्तशृंग गडावर पुढील तीन दिवस मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गडावर पोलीस प्रशासन सज्ज असून भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरात्रोत्सवात गडावर येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे कांगणे यांनी सांगितले. महिला आणि वृद्धांची गैरसोय होणार नाही. यासाठी विशेष नियोजन विश्वस्त मंडळ आणि रोपवे प्रशासनाने करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी बांबळे, कळवण पोलीस निरीक्षक खेगेंद्र टेंभेकर आदी उपस्थित होते. उत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस कर्मचारी व गृहरक्षकदेखील महत्त्वाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police appeal devotees to cooperate at saptashrungi fort to control crowd zws