शहर परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहर पोलीस आयुक्तांनी एक ते १५ डिसेंबर या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागु केले आहेत. यामुळे महाआरती करणे, घंटानाद करणे, धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करणे आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>मुंबई: जळगाव घरकुल घोटाळा प्रकरण; सुरेशदादा जैन यांना उच्च न्यायालयाकडून कायमस्वरूपी जामीन

शहरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कामगार संघटना यांच्या वतीने सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने होत असतात. तसेच धार्मिक सण-उत्सव इतर कार्यक्रमाचे आयोजन होते. या सर्व घडामोडीत धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहर पोलीस आयुक्तांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारपासून १५ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्र किंवा अस्त्र बरोबर घेण्यास मनाई आहे, घोषणा देणे, वाद्य वाजविणे, कोणत्याची व्यक्तीच्या चित्राचे, प्रतिकात्मक मृतदेहाचे किंवा पुढाऱ्याचे चित्र जाळण्यास मनाई आहे. सभ्यता अगर नीतीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल, अशी कृती करू नये, सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून शहरात फिरणे, सार्वजनिक ठिकाणी पेढे वाटणे, फटाके वाजविणे, घंटानाद करणे, धार्मिक तेढ करणारी शेरेबाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prohibitory order imposed in the city for 15 days in nashik amy