नाशिक – सार्वजनिक ठिकाणी रंगमंचावर सादर होणाऱ्या प्रयोगाच्या संहितांचे पूर्व परिक्षण करण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने जाहीर केलेल्या सेन्सॉर बोर्डाच्या यादीत नाशिकचे ज्येष्ठ लेखक विवेक गरुड यांची निवड झाली आहे. नाशिकमधून निवड झालेले ते एकमेव रंगकर्मी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विवेक गरुड यांची अनेक नाटके रंगमंचावर गाजली आहेत. त्यात राजीचा मोर, इतिहासाच्या पुस्तकाची पाने कापून रोजच्या आयुष्याला चिकटवलेली चित्रकथा, फ्लॅश बॅक अन्ड सिक्वेन्स अशा अनेक नाटकाचा समावेश आहे. या अगोदरही विवेक गरुड यांनी विविध संस्थांच्या नाट्यस्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून कामगिरी बजावली आहे. अँबस्ट्रक्ट हा त्यांचा फॉर्म असून त्यांची नाटके विचार करायला भाग पाडतात. अत्यंत वेगळ्या शैलीतील नाटककार म्हणून ते महाराष्ट्राला परिचीत आहेत. त्याच्या निवडीमुळे खऱ्या अर्थाने नाशिकला न्याय मिळाला अशी भावना रंगकर्मींमध्ये आहे. रंगकर्मी प्रयोग परिक्षण मंडळात या अगोदर त्यांनी दोन टर्म कामगिरी केली आहे.

हेही वाचा – नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत बाहेर फिरण्यावर निर्बंध; नव्या प्रणालीद्वारे हालचालींवर लक्ष; आजपासून अमलबजावणी

या विषयी बोलतांना गरुड म्हणाले, दर महिन्यात नव्या दमाच्या नाटककारांच्या संहिता वाचणे आणि महाराष्ट्रभरच्या रंगकर्मींना एकत्र भेटणे हा आनंदाचा भाग आहे. नवे प्रवाह, नवे विषय, नव्या संहिता वाचणे आणि त्यावर सकारात्मक चर्चा घडणे महत्त्वाचे आहे. तसेच अप्रस्तुत विषय, भाषा आशय, यांना सर्व बाजूने चर्चा करून प्रतिबंध करणं हेही महत्त्वाचे कार्य आहे. नाशिक जिल्ह्याचा प्रतिनिधी असल्याने नव्या संहितांना व संघाना मदत करता येईल याचा आनंद आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior theater director vivek garud has been appointed as a member of the censor board ssb