उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून राबविण्यात येणाऱ्या अमृत सरोवर प्रकल्पाचे स्वागत असून नॅशनल वेटलँड्स ॲटलासने दोन लाखांहून अधिक पाणथळ जागांसह ८० हजार अमृत सरोवरांना पाणथळ जागा म्हणून अधिसूचित करावे व त्यांचे संवर्धन करावे असे आवाहन पर्यावरणवाद्यांनी केले आहे. बेशिस्त नागरीविकासामुळे ॲटलासने सुनिश्चित केलेल्या पाणथळ जागांची यादी करणे आणि त्या अधिसूचित करण्यात स्पष्टता नसल्याने देश मौल्यवान जलस्त्रोत गमावत आहोत. याकडे पर्यावरणवाद्यानी पंतप्रधानांचे यानिमित्ताने लक्ष वेधले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरने (एस.ए.सी ने) तयार केलेल्या यादी प्रमाणे ७.५७  लाख पाणथळ क्षेत्रांपैकी केवळ १.२५५ पाणथळ जागा अधिसूचित करण्यात आल्या आहेत.अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण मंत्रालय (एम.ओ.इ.एफ.सी.सी) ने प् इंडियन वेटलँड्स वेबसाइटवर नोंदविले आहे. या ७.५७ लाख पाणथळ क्षेत्रांपैकी दोन लाखांहून अधिक पाणथळ जागा आहेत ज्या २.२५ हेक्टरपेक्षा मोठ्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्याचे संरक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

 सन २००६-०७ व २०१६-१७ मधील वेटलॅंड ॲटलास च्या दशकीय बदलानुसार पाणथळ जागांची यादी करण्यात आली आहे. मात्र ती अधिसूचित करण्यात मोठ्या विलंब होत असल्याने या मुद्द्याकडे आम्ही आपले लक्ष वेधत असल्याची माहिती नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As amrit sarovar to save perishable water resources environmentalists request to prime minister narendra modi ysh