पहिली लोकल सकाळी ७.५७ वाजता

नवी मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी  नेरूळ ते बेलापूर ते खारकोपर उपनगरी सेवांच्या वेळेत १८ डिसेंबरपासून बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार नेरूळ ते खारकोपर अशी पहिली लोकल सकाळी ७.५७ वाजता सुटेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

अनेक महिन्यांपासून बंद असलेली रेल्वेसेवा २० नोव्हेबरपासून सुरू झाल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र मर्यादित फेऱ्यांमुळे गैरसोय होत असल्याने या मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आल्या आहेत.

रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. प्रवाशांना सर्व निकषांचे पालन करावे व इतर प्रवाशांनी स्थानकांवर गर्दी करू नये, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांनी सांगितले.

नवीन वेळापत्रक

  • नेरूळ ते खारकोपर ०७.४५
  •  खारकोपर ते बेलापूर सकाळी ८.१५
  •  बेलापूर ते खारकोपर सकाळी ८.४७
  •  खारकोपर ते नेरूळ सकाळी ०९.१५
  •  नेरूळ ते खारकोपर सायंकाळी १७.४५
  •  खारकोपर ते बेलापूर सायंकाळी १८.१५
  •  बेलापूर ते खारकोपर सायंकाळी १८.४८
  •  खारकोपर ते बेलापूर रात्री १९.१६