‘शून्य कचऱ्याचा प्रारंभ माझ्यापासून’ या नवी मुंबईतील शाळा-शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमांतर्गत १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ३२ शाळांतील ५ हजार १४६ विद्यार्थ्यांनी ८७२० प्लास्टिक बाटल्यांमध्ये तब्बल ९६१ किलोहून अधिक वजनाचे तुकड्यांच्या स्वरुपातील प्लास्टिक संकलीत केले. या उपक्रमामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शाळा आणि विद्यार्थ्यांचा नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथील विशेष समारंभात गौरव करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलांना लहान वयापासून स्वच्छतेसोबतच प्लास्टिकचे दुष्परिणाम समजून प्लास्टिक प्रतिबंधाविषयी त्यांची मनोभूमिका तयार व्हावी या दृष्टीने ‘शून्य प्लास्टिकची सुरुवात माझ्यापासून’ हा अभिनव उपक्रम राबविला जात असून, या अंतर्गत विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्याची प्लास्टिक बॉटल घेऊन त्यामध्ये चॉकलेट्सचे रॅपर, वेफर्सचे प्लास्टिक पॅकेट्स, दुधाच्या पिशव्या अथवा सॅशेचे कापलेले तुकडे, प्लास्टिकचे लहान लहान तुकडे जमा करावेत व ती बाटली पूर्ण भरल्यानंतर आपल्या वर्गशिक्षकांकडे जमा करावी, अशा प्रकारे उपक्रम राबविण्यात येत आहे.

हेही वाचा – आरोग्य, शिक्षणासाठी शासकीय खर्च होणे गरजेचे ! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

उपक्रमात इतरत्र फेकले जाणारे व सहजपणे दुर्लक्षित होऊ शकेल असे छोट्या छोट्या तुकड्यांच्या स्वरुपातील प्लास्टिक विद्यार्थ्यांमार्फत जमा होऊन पर्यावरणाची संभाव्य हानी टाळली जात आहे. शाळा-शाळांमधून विद्यार्थ्यांमार्फत जमा होणाऱ्या बाटल्या महानगरपालिकेकडे संकलीत केल्या जात असून त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात येत आहे. याकरीता हार्ट फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. इलिस जयकर यांच्यामार्फत विशेष योगदान दिले जात असून, त्यांचाही गौरव करण्यात आला.

हेही वाचा – नवी मुंबई : कळंबोलीतील घरफोडीत २० तोळे सोने चोरी

‘झिरो प्लास्टिक स्टार्ट्स विथ मी २.०’ या उपक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रातील शाळांना गौरविण्यात आले. तसेच संपूर्ण नमुंमपा क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या चार्टर्ड इंग्लिश स्कुल ऐरोली, ज्ञानपुष्प विद्यानिकेतन बेलापूर व सेंट ऑगस्टिन हायस्कुल नेरूळ या ३ शाळांना सन्मानीत करण्यात आले. प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रातील शाळांमध्ये सर्वोत्तम विभागीय कामगिरी करणाऱ्या प्रत्येक विभागातील एका विद्यार्थ्यास गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे साई होलीफेथ हायस्कुल कोपरखैरणे येथील रिचा पाटील, चार्टर्ड इंग्लिश स्कुल ऐरोली येथील वेदिका वाईरकर आणि टिळक इंटरनॅशनल स्कुल घणसोली येथील दियान कोटियन, अशा ३ विद्यार्थ्यांना संपूर्ण नमुंमपा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल सन्मानीत करण्यात आले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collection of 962 kg of plastic by students under the initiative zero plastic starts from me in navi mumbai ssb