नवी मुंबई (Navi Mumbai) हे महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर असून त्याचे क्षेत्रफळ १६४ चौरस किलोमीटर आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या बघता महाराष्ट्र सरकारने जुलै १९५८ रोजी नवी मुंबई (Navi Mumbai City) हे नवीन शहर वसवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याची जबाबदारी सिटी अॅण्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉपरेरेशन अर्थात सिडकोकडे देण्यात आली. सिडकोनेही वाणिज्य, रोजगार, दळणवळण, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांनी सुसज्य असे शहर वसवले. कोणत्याही शहराच्या विकासासाठी रेल्वे ही महत्त्वाची भूमिका बजावत असते.
त्या दृष्टीने सिडकोने भारतीय रेल्वेबरोबर करार करत नवी मुंबईत रेल्वेचे जाळे निर्माण केले. आज मानखुर्द-पनवेल आणि ठाणे-तुर्भे रेल्वे मार्गावर लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. आज राज्याच्या विकासात नवी मुंबई हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. Read More
दोन महिन्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघांतून निवडणूक लढवू पाहणाऱ्या राजकीय नेतेमंडळींच्या फलकांमुळे नवी मुंबई शहर विद्रूप…