Due to technical failure in the Vashi feeder power supply was interrupted in several parts of Koparkhairane Vashi area | Loksatta

नवी मुंबई :वाशी फिडरमधील तांत्रिक बिघाडामुळे कोपरखैरणेतील अनेक भागात अंधार; दोन तासांनी वीजपुरवठा सुरळीत

वाशी फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कौपरखेरणे भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता. तब्बल दोन तासानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, अद्याप काही भागात वीजपुरवठा विस्कळीत असल्याची माहिती मिळाली आहे.

नवी मुंबई :वाशी फिडरमधील तांत्रिक बिघाडामुळे कोपरखैरणेतील अनेक भागात अंधार; दोन तासांनी वीजपुरवठा सुरळीत
वाशी फिडरमधील तांत्रिक बिघाडामुळे कोपरखैरणेतील अनेक भागात अंधार

नवी मुंबईतील महावितरणच्या वाशी फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कोपरखैरणे वाशी भागातील हजारो घरात व रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. आठ वाजण्याच्या सुमारास खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत होण्यास सुमारे दोन तासांचा अवधी लागला.

हेही वाचा- नवी मुंबईत स्वच्छ भारत अंतर्गत करण्यात येणारे रंगकाम निकृष्ट दर्जाचे; अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष

नवी मुंबईत, वाशी नोड येथील महावितरणच्या फिडर मधून कोपरखैरणे लगत वाशीतील सेक्टर १५ ते २९ आणि पूर्ण कोपरखैरणे नोडला विद्युत पुरवठा होतो. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास याच फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वाशी सेक्टर १५ ते २९ व जवळपास पूर्ण कोपरखैरणे नोड मध्ये वीज पुरवठा खंडित झाला. वाशी फिडर मधील तांत्रिक बिघाड सुमारे अर्ध्या तासात दूर करण्यात आला . त्यामुळे वाशी उजळली मात्र कोपरखैरणे सेक्टर ११ येथील जनित्र केबल मध्ये आग लागल्याने कोपरखैरणे मध्ये सेक्टर १५ ते २१ मध्ये अंधाराचे साम्राज्य होते. महावितरणचे मुख्य अभियंता राजाराम माने यांनी पुढाकार घेत सूत्र हलवली . त्यामुळे युद्ध पातळीवर दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली व टप्प्याटप्प्याने रात्री पावणे दहा पर्यंत कोपरखैरणे भागात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यश आले.

हेही वाचा- सीवूड्समधील टिळक एज्युकेशन शाळेच्या इमारतीत अनधिकृत बांधकाम; नवी मुंबई महापालिकेने बजावली नोटीस

वाशी सेक्टर १४ ते १६, शिरवणे गाव, कोपरखैरणे सेक्टर ८ ते १२, नेरुळ नोडचा काही भाग, तुर्भे गाव येथे अद्याप वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही . टप्प्याटप्प्याने विज पुरवठा सुरळीत होईल असे महावितरणतर्फे सांगण्यात आले. मात्र किती वेळ लागेल याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 22:41 IST
Next Story
नवी मुंबईत स्वच्छ भारत अंतर्गत करण्यात येणारे रंगकाम निकृष्ट दर्जाचे; अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष