eletricity missing for 12 hours in khandeshwar at panvel | Loksatta

पनवेल : खांदेश्वरमधील वीजग्राहक १२ तासांपासून वीजेविना

वीजवाहिनी तुटल्याने हा विजखोळंबा झाल्याची माहिती वीज महावितरण कंपनीचे कर्मचारी देत होते.

Electricity heavy rain
संग्रहित छायाचित्र

खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर 6 परिसरातील विजग्राहक रविवारी मध्यरात्रीपासून वीजेविना आहेत. दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत विजग्राहकांना वीज नेमकी कधी येणार याची माहिती मिळाली नसल्याची तक्रार विजग्राहक करत होते. रविवारी रात्री दोन वाजल्यापासून सेक्टर 6 व परिसरात अनेकांची वीज गायब झाली. वीजवाहिनी तुटल्याने हा विजखोळंबा झाल्याची माहिती वीज महावितरण कंपनीचे कर्मचारी देत होते.

हेही वाचा : नवी मुंबई : पितृपक्ष पंधरवडा सुरू मात्र भाज्यांची मागणी मंदावली

मात्र सकाळी वीज येईल अशी अपेक्षा होती. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत 12 तास उलटले तरीही खांदेश्वर वसाहतीमधील अनेक भागात वीज परतली नसल्याने वीजग्राहक संतापले होते. वीज महावितरण कंपनीचे अभियंता माने यांनी वीजवाहिनी दुरुस्तीचे काम सूरु असून लवकरच वीज परत येईल अशी माहिती दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-09-2022 at 15:51 IST
Next Story
नवी मुंबई : पितृपक्ष पंधरवडा सुरू मात्र भाज्यांची मागणी मंदावली