नवी मुंबई : दिघा एमआयडीसी मधील .महाराष्ट्र फ्लोअर मिल कंपनीला या लागली आग लागली होती. आगीत  सदर कंपनी पूर्ण जळून गेली आहे. आज दुपारी दिघा एमआयडीसीतील महाराष्ट्र फ्लोअर मिल या बंद असलेल्या कंपनीत आग लागली. कंपनी अनेक वर्षांपासून बंद असल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही.आगीत चार मजली कंपनी पूर्णतः जळून खाक झाली. आगीचे वृत्त कळताच रबाळे एमआयडीसी ऐरोली येथिल अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचले. तीन तासांच्या प्रयत्नांनी अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण मिळवले.