वातावरणात पहाटेच्या वेळी धुके पडू लागले असून तपमान कमी झाल्याने सोमवारी गारव्यातही वाढ झाली होती. या बदलत्या वातावरणामुळे उरणमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे उरणमधील तपमान ३४ डिग्री वरून २७ डिग्रीपर्यंत पोहचले आहे.

हेही वाचा- उरणमध्ये एमआयडीसी कडून आठवड्यातील दोन दिवसांची पाणी कपात

यावर्षी थंडी उशीरा सुरू झाली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून उरणमधील तपमानात घट होऊ लागली आहे.त्यामुळे उरणच्या अनेक भागात पहाटे पासून ते सकाळी ९ वाजेपर्यंत हे धुके पडत आहे. धुक्यातून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांना वाहनांचे दिवे लावावे लागत आहेत. परतीचा पाऊस उशिरा पर्यंत राहिल्याने थंडी ही उशिरा सुरू झाली आहे. यावर्षी नोव्हेंबर च्या मध्यावर थंडी सुरू झाल्याने याचा परिणाम शेतीवर व हिवाळ्यात घेतल्या जाणाऱ्या पिकांवर ही होणार आहे. त्यामुळे उरणमधील शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. कारण थंडीत पडणाऱ्या डाव कणांवर अवलंबून असलेल्या पिकांवर त्याचा परिणाम होणार आहे. मात्र उशिरा का होईना थंडीला सुरुवात झाल्याने उरणमधील नागरिकांना या थंडीचा आनंद घेता येणार आहे.