शीव पनवेल महामार्गावर धावत्या दुचाकीवर तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. रात्रीचे जेवण झाल्यावर तीन तरुणी आपल्या मित्रांसोबत दुचाकीवर फिरायला गेल्या होत्या. तेव्हा अनोळखी दुचाकीस्वारांनी एका तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित तरुणीने बेलापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपी दुचाकीस्वारांचा शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पीएफआय’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पनवेलमधून अटक

बेलापूरमधील सेक्टर १९ मध्ये राहणारी २६ वर्षीय तरुणी तिच्या मैत्रिणींसोबत मंगळवारी रात्री घराबाहेर गेली होती. तेथे जेवणासाठी उशीर झाल्याने मध्यरात्री त्यांच्या मित्रमंडळींनी बेलापूर ते खारघर असा दुचाकीवरुन प्रवास करण्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणे एका दुचाकीवर तीन तरुणी आणि दूस-या दुचाकीवर मित्र असा प्रवास सूरु झाला. मात्र, प्रवासादरम्यान एका केटीएम दुचाकीवर दोन तरुणांनी या तरुणींचा पाठलाग केला. धावत्या दुचाकीवर या तरुणीच्या मांडीला व खांद्याला स्पर्श केल्याचे तरुणीने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच हे उपद्रवी तरुण एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी या तरुणींच्या मित्राला दगड मारल्याचे या तरुणींनी पोलिसांना सांगितले. पोलीस उपनिरिक्षक विष्णू डुबल हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. संबंधित तरुणींनी दूस-या दिवशी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. संशयीत आरोपी असलेल्या अनोळखी केटीएम दुचाकीस्वारांना शोधण्यास पोलीसांना त्रास होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl molested on running bike by other bike rider on shiv panvel highway navi mumbai dpj