नवी मुंबई: देशभरात लसीचा तुटवडा असून नवी मुंबई शहरातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पालिका स्वत: ४ लाख लस खरेदी करणार आहे. त्यासाठी पालिकेने जागतिक निविदा काढली असून ही निविदा रविवारी प्रसिद्ध होणार आहे. या निविदेसाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात २ लाख ५१ हजार ३५५ नागरिकांचे लसीकरण झालेले असून सध्या लशींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने अडथळे निर्माण होत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2021 रोजी प्रकाशित
लस खरेदीसाठी नवी मुंबई महापालिकेकडून जागतिक निविदा
निविदेसाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 16-05-2021 at 01:11 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global tender from navi mumbai municipal corporation for purchase of vaccine akp