येत्या २ वर्षात पायाभूत सुविधा तसेच पाण्याची समस्या सोडवण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत उदयोजकांना दिले. बुधवारी ते लघु उद्योजक संघटना, एमआयडीसीकडून महापे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी एमआयडीसीचे उच्च पदस्थ अधिकारी तसेच लघु उद्योजक पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, मनपा आयुक्त राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पनवेल महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ भारत’ सर्वेक्षणच्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडरपदी दिलीप वेंगसरकर आणि गायक सागर म्हात्रे

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी नवी मुंबईतील उद्योजकांसमवेत विविध विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत लघु उद्योजकांच्या समस्या त्यांच्या अडचणी जाणून घेऊन तात्काळ संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना या समस्या सोडविण्यासाठीचे निर्देश देण्यात आले. आठवड्यातील दोन दिवस राज्यातील मोठ्या औद्योगिक वसाहतींना भेट देऊन समस्या जाणून घेणार व त्यावर उपाययोजना करणार असल्याचे उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा- यंदा नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाची दिवाळी गोड …..किती मिळणार सानुग्रह अनुदान !

एमआयडीसीमधील सर्व रस्ते दोन वर्षांमध्ये पूर्ण होतील. पाण्याच्या योजना एका वर्षामध्ये पूर्ण होतील. मलनिःसारण वहिनीसारखे विषय मार्गी लावले जातील, असे आश्वासन उद्योजकांना देण्यात आले. तसेच आयटी पॉलिसी फायनल केली आहे. आयटीमधील इंडस्ट्रियल सेक्टरला जास्तीत जास्त लाभ देण्याची भूमिका सरकारची आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रेझेंटेशन सादर केल्यानंतर एक चांगली आयटी पॉलिसी पुढे येईल आणि त्यातून आयटी उद्योग उभारी घेईल, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industry minister uday samant participated in the meeting of entrepreneurs association midc navi mumbai news dpj