सन २००३ महापालिकेच्या धोकादायक यादीत समाविष्ट होत असलेल्या  मुबंई कृषी उत्पन्न  कांदा बटाटा बाजाराचा  पुनर्विकास गेले प्रत्येक वर्षांपासून रेंगाळलेला आहे. आता बांधा आणि वापरा तत्वावर खाजगी विकासकांकडून करून घेण्याचे नियोजन सुरू असून यादरम्यान  सदर बाजाराची उभारणी सिडकोने केली आहे.त्यामुळे याचा पुनर्विकास देखील सिडकोनेच करावा अशी नवीन मागणी येथील व्यापाऱ्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर सिडको अभियंत्यांनी मंगळवारी कांदा बटाटा बाजाराची पाहणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> उरण मध्ये ६४ वर्षीय महिलेची हत्या; आरोपी फरार,पोलीसांचा तपास सुरू

सन १९७९-८० चे दरम्यान सिडकोने  वाशी  येथील ७.९२ हेक्टर (७९१७८.७३ चौरस मिटर) भूखंडावर कांदा, बटाटा बाजाराची उभारणी केली आहे. सिडकोने एपीएमसीला १०० वर्ष भाडेतत्त्वावर जागा दिली असून एपीएमसीने व्यापाऱ्यांना ६० वर्षे भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. परंतु   तीस वर्षांच्या कालावधीतच निकृष्ट बांधकाम दर्जामुळे बाजाराची पडझड झाली आहे. सन २००३ पासून धोकादायक यादीत समाविष्ट होत असलेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा मुद्दा गाजत आहे.  उच्च न्यायालयाने पुनर्विकास करण्याचा सन २००५ मध्ये आदेश दिला आहे. तेव्हापासून गेले १७ वर्षांपासून हा  पुनर्विकास रखडला आहे. सुरुवातीला व्यापाऱ्यांनी पुनर्बांधणीत आम्हाला वाढीव एफएसआय द्यावा अशी मागणी केली होती. मात्रा हा पुनर्विकास करण्यासाठी एपीएमसी प्रशासनानेडोके निधीचा अभाव असल्याने व्यापाऱ्यांनी निधी देण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा >>> नवी मुंबईत सम विषम पार्किंग फलक उरले नावापुरते; शहरात पार्किंगचा बट्ट्याबोळ,सम विषम तारखानुसार पार्किंग फक्त कागदावर

अखेरीस मागील एक वर्षांपासून  पुनर्विकास करण्यासाठी निधीचा अभाव असल्याने  संचालक मंडळ तसेच एपीएमसीने बांधा आणि वापरा तत्वावर पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत चर्चेची गुऱ्हाळ सुरू आहेत.  यात काही व्यापाऱ्यांची देखील मत मतांतरे आहेत. तसेच राजकीय हस्तक्षेप होत असल्याने पुनर्विकास रेंगाळत आहेत अशा ही चर्चा बाजार वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे सिडकोने एपीएमसीचे बांधकाम करून दिलें असल्याने आता पुन्हा एपीएमसी ची पुनर्बांधणी देखील सिडकोनेच करावी अशी मागणी कांदा  बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सिडकोकडे होती. त्या पार्श्वभूमीवर सिडको अभियंत्यांनी मंगळवार दिनांक ३ जानेवारी रोजी कांदा बटाटा बाजाराची पाहणी केली.  पाहणी दौऱ्यात धोकादायक इमारतींचा आढावा घेतला. त्यामुळे बाजाराच्या पुनर्विकासबाबत सिडको काय निर्णय घेते याकडे व्यापाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

कांदा बटाटा बाजाराचा पुनर्विकास देखील सिडकोने करावा असे मागणी केलेले पत्र आमच्या कडे आले आहे. त्याअनुषंगाने  कांदा बटाटा बाजाराची  प्राथमिक स्तरावर पाहणी केली असून याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल. यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल.

अर्चना  आतर्डे,सहाय्यक अभियंता,सिडको.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspection of onion potato market by cidco engineers zws