नवी मुंबई शहरात गॅस वितरकांकडून रस्त्यावरच सिलिंडर भरलेली वाहने उभी केली जात आहेत. वाशी-कोपरखैरणे मार्गावर जुहूगाव मरीआई मंदिराजवळ घरघुती गॅस सिलिंडरने भरलेली वाहने उभी केली जात असल्याने या ठिकाणी वाहतूककोंडी होत असते. तसेच या वाहनांमधून रस्त्यावरच गॅस सिलिंडर हाताळले जात असल्याने स्फोट झाला तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. गॅस वितरकांकडून अपघाताला निमंत्रण दिले जात असून, याकडे महापालिका आणि वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नवी मुंबई महापालिकेचा दिव्याखाली अंधार… पालिका मुख्यालय परिसरात कचऱ्याचा ढीग

वाशी-कोपरखैरणे मार्गावरील जुहूगाव मरीआई मंदिरासमोर एचपी गॅसची घरघुती सिलिंडर पुरवणारी  एजन्सी आहे. या ठिकाणी  गॅस सिलिंडर घेऊन रोज मोठी वाहने येत असतात. तर या मोठ्या वाहनांमधून शहारातील भागात गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी छोट्या वाहनांत गॅस सिलिंडर भरले जातात. या ठिकाणी रोज १० ते १२  अशी वाहने उभी असतात. त्याचबरोबर गॅस सिलिंडर हाताळणी ही रस्त्यावरच केली जाते. शिवाय रस्त्यावर उभ्या असलेल्या या वाहनांमुळे वाहतूककोंडी होते. या ठिकाणी वाहनाचा अपघात झाल्यास त्यात गॅस हाताळणी रस्त्यावरच होत असल्याने भविष्यात  गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन  मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. मंदिराच्या पलीकडे पेट्रोल पंपदेखील आहे. या पेट्रोल पंपावर सीएनजी गॅसदेखील भरला जातो. त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही वाहने नागरी वस्तीपासून दूर ठेवावीत, जेणे करून या वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी तर दूर होईलच, शिवाय गॅस सिलिंडरमुळे जर एखादा स्फोट झाला तर होणारी हानी टाळता येऊ शकेल. त्यामुळे ही वाहने इतरत्र उभी करावीत अशी मागणी होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lgp cylinders loaded truck park on road in navi mumbai zws