उरण : बोकडवीरा पोलीस चौकी ते उरण कोटनाका हा रस्ता येथील मोऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र तरीही त्याच ठिकाणी काही प्रमाणात उपलब्ध असलेल्या एका छोट्या मार्गाने ये-जा करण्यासाठी अनेक दुचाकी,चारचाकी व रिक्षा चालक बंद रस्त्यातील अडथळे दूर करीत धोकादायक प्रवास करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… ‘मुंबई ते नवी मुंबई प्रवास २० मिनिटांत’; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पारबंदर प्रकल्पाच्या कामांचा आढावा

उरण-पनवेल या महत्वपूर्ण मार्गावरील उरण रेल्वे स्थानक व आनंदी हॉटेल येथील दोन्ही मोऱ्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बोकडवीरा उड्डाणपूल येथून रस्ता बंद केला आहे, त्यासाठी मातीचा ढीग बनविण्यात आला आहे. हा मार्ग उरण रेल्वे स्थानकातून जात असल्याने मातीचे ढीग दूर सारून या मार्गाने दुचाकी स्वार प्रवास करीत आहेत. मात्र रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग वारंवार हा मार्ग बंद करीत आहे. मात्र पुन्हा पुन्हा हा मार्ग धोकादायकरित्या सुरू करून प्रवास केला जात आहे. यासाठी बोकडवीरा ते नवीन शेवा उड्डाणपूल मार्गे उरण हा पर्यायी मार्ग असून त्याऐवजी या मार्गाचा वापर केला जात आहे. मात्र सातत्याने हा मार्ग बंद केला जात आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई सेझ मार्ग हा खड्डे, खडी व धुळीचा असल्याने दुचाकीस्वार धोकादायक प्रवास करीत आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorists facing forcefull dangerous journey due to closure of uran panvel road asj