नवी मुंबई : केंद्र सरकारने डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन केले असून महावितरण विभागानेही ऑनलाईन वीज भरल्यास ०.२५ टक्के देयकात सवलत दिली आहे. तसेच ऑनलाईनमुळे वेळेची मोठी बचत होत असल्याने ऑनलाईन वीज देयक भरण्याकडे कल वाढत आहे. जुलै महिन्यात ५६३ कोटी १५ लाख ६० हजार पेक्षा अधिक रुपयांची देयके ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरकारच्या सर्व सेवा  क्षेत्रात डिजिटल पद्धतीने सक्षम बनविण्यासाठी भारत सरकारने डिजिटल इंडिया मोहीम सुरू केली आहे. आजच्या व्यस्त आणि धावपळीच्या जीवनात आपण सोप्या व  कमी वेळ घेणार्‍या माध्यमांना प्राधान्य देतो. मोबाईल बिल असो टीव्ही रिचार्ज किंवा एखाद्या छोट्या व्यवहारासाठीसुध्दा आपण डिजिटल देयके भरतो. त्याचप्रमाणे, आता वीजबिल भरण्यासाठीसुद्धा ग्राहक ऑनलाइन माध्यमांना पसंती देत आहेत. महावितरणच्या भांडूप परिमंडलामध्ये जुलै महिन्यात सर्व वर्गवारीतील लघुदाब ग्राहकांकडून एकूण ५६३ कोटीचे १५ लाख ६० हजार पेक्षा जास्त व्यवहार वीजबिल भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आलेले आहेत.  

हेही वाचा : उरण पनवेल रस्त्यावर मोकाट गुरांचा अघोषित रास्ता रोको, गुरे आणि प्रवाशांना अपघाताचा धोका

जे वीज ग्राहक रांगेत उभे न राहता ऑनलाइनद्वारे वीजबिल भरतात अशा ग्राहकांनी मोठ्या संख्येने “प्रोम्ट पेमेंट” सवलतीचा लाभ घेतला आहे. वीजबिलाचा ऑनलाइन भरणा केल्यास ०.२५ टक्के (५०० रुपयांपर्यंत ) सूट दिली जाते. क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय, भीम अॅप, इंटरनेट बँकिग, मोबाइल वॉलेट आणि मोबाइल बँकिंगद्वारे महावितरणच्या मोबाइल अॅप किंवा अधिकृत वेबसाइटद्वारे ग्राहक सोयीस्करपणे आणि सुरक्षितपणे घरबसल्या वीज बिल भरू शकतात. यापूर्वी ‘RTGS’ किंवा ‘NEFT’ द्वारे वीज बिल भरण्याची मर्यादा १० हजार रुपयांपेक्षा जास्त होती. ही मर्यादा आता किमान ५ हजार रुपये करण्यात आली आहे. त्यानुसार या ग्राहकांच्या ५ हजार रुपयांहून अधिक रकमेच्या वीजबिलावर महावितरणच्या बँक खात्याचे तपशीलही दिले जात आहेत, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी ममता पांडे यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai residents 563 crore rupees electricity bill paid online in july month css