NMMT bus caught fire at Taloja panvel | Loksatta

पनवेल : तळोजा येथे एनएमएमटीच्या बसला आग; सुदैवाने जिवितहानी नाही

या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसली नाही. मात्र, आग विझविण्यासाठी लागणारी उपकरणे बसमध्ये नसल्याचे समोर आले आहे.

पनवेल : तळोजा येथे एनएमएमटीच्या बसला आग; सुदैवाने जिवितहानी नाही
तळोजा येथे एनएमएमटीच्या बसला आग

तळोजा वसाहतीमध्ये बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम सेवेच्या (एनएमएमटी) ५५ क्रमांकाच्या
बसला आग लागली. रेल्वे भूयारी मार्गाशेजारी बसमधून धूर बाहेर पडल्यानंतर प्रवाशांनी गाडी बाहेर पडण्यास सुरुवात केली. प्रवाशांची तारंबळ उडाली. वाहनचालकाने तातडीने बस रस्त्याकडेला लावल्याने प्रवासी सुरक्षित बाहेर पडू शकले.

हेही वाचा- भरदिवसा कार्यालयात घुसून बांधकाम व्यवसायिकाला सिने स्टाईलने मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी आग विझविण्यासाठी लागणारी उपकरणे बसमध्ये त्यावेळी उपलब्ध नव्हते. अग्निशमन दलाच्या बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवले. यापूर्वीही बस आगारातून बाहेर काढताना वाहनचालक बसच्या ना दुरुस्तीच्या तक्रारी आगार नियंत्रकांकडे करतात. मात्र, चांगल्या बस सेवा एनएमएमटीच्या ताफ्यात नसल्याने असुरक्षित प्रवास वाहनचालक व प्रवाशांना करावा लागत आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भरदिवसा कार्यालयात घुसून बांधकाम व्यवसायिकाला सिने स्टाईलने मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

संबंधित बातम्या

विमानतळ निविदा अडचणीत?
चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल, म्हणाल्या “असे कितीही आडवे आले तरी…”
नवी मुंबई: ऐरोली खाडी किनारी परदेशी पाहुण्यांचे आगमन; फ्लेमिंगो दाखल झाल्याने बोटींग सफर लवकरच सुरू होणार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Tik Tok स्टार मेघा ठाकूरचं निधन, सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्टमुळं अवघ्या कलाविश्वात शोककळा
‘सेस’ इमारतीमधील मालकांची दादागिरी संपवली, भाडेकरूंच्या पुनर्विकासाचा मार्ग सरकारी राजमार्गाने मोकळा – आशिष शेलार
मुंबई: ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ला अदानी समूहाची वीज ; एमएमआरडीएबरोबर करार
“शिवरायांच्या अपमानावर गप्प बसणारे राज्यपालांइतकेच दोषी”, उदयनराजेंच्या विधानावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले…
पार्किंगमधून वाहन चोरीला गेल्यास काय कराल? जाणून घ्या यासंबंधीचे नियम