लोकसत्ता वार्ताहर
नवी मुंबई : एपीएमसीतील भाजी बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. ८० रुपयांवर गेलेल्या वाटाण्याचे दर २५
पावसामुळे नुकसान झाल्याने भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले होते. आता परराज्यातील भाज्यांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे बाजारात आवक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी बाजारात एकूण ५५६ गाडय़ा दाखल झाल्या आहेत. परराज्यांतील वाटाणा मोठय़ाप्रमाणत आला आहे. मध्यप्रदेश येथून हिरवा वाटाणा २ हजार ८४८ क्विंटल दाखल झाला आहे. त्यामुळे ७० तर ८० रुपये प्रतिकिलो दर असलेला वाटाणा गुरुवारी २४ ते २६ रुपये प्रतिकिलोवर आला आहे. याबरोबरच कोबी, फ्लावर, दुधी, शिमला मिरची, काकडी, वांगी यांचीही आवक वाढल्याने दर कमी झाले आहे. घाऊक बाजारात या भाज्या २० ते ३० रुपये प्रतिकिलो होत्या. त्यात दहा रुपये प्रतिकिलोचे दर कमी झाले आहेत. पालेभाज्यांचे दर स्थिर असून प्रतिकिलो ८ ते १० रुपयांवर आहेत.