वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात सोमवारी बाजारात भाज्यांची नेहमीपेक्षा ६८५ गाड्या अशी जास्त आवक झाली आहे. पितृपक्ष पंधरवड्यात भाज्यांना अधिक मागणी असते. बाजारात भाज्यांची आवक वाढून ही पावसामुळे भाज्या खराब होत असल्याने भाज्यांना मागणी कमी आहे.
अनंतचतुर्दशी नंतर शनिवारी पासून पितृपक्ष पंधरवडा सुरू झाला असून , यादरम्यान भाज्यांना अधिक मागणी असते.

पितरांना गोड पदार्थ त्याबरोबर पाच प्रकारच्या भाज्या असे पंचपकवानाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे या पंधरवड्यात फळ-भाज्या, पालेभाज्यांना अधिक मागणी असते. सोमवारी बाजारात ६८५ गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र पावसामुळे खराब होत आहेत. त्यामुळे बाजारात कमी मागणी आहे. शेतमालाला उठाव नसल्याने ३०% ते ४०% भाज्या शिल्लक राहिल्या आहेत.

हेही वाचा : पनवेल : रॅगिंग प्रकरणी विद्यार्थ्यांच्या चौकडीवर पोलीसांत गुन्हा दाखल ; कामोठे येथील दंतवैद्यकीय महाविद्यालयातील घटना

पालेभाज्या दरात वाढ

पितृपक्ष पंधरवड्यात पालेभाज्यांना ही अधिक मागणी असते. बाजारात ७० ते ८० गाड्या पालेभाज्या दाखल झाल्या असून त्यामध्ये ३०% पालेभाजी खराब येत आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. भाज्या खराब येत असल्याने ग्राहक कमी प्रमाणात भाज्या खरेदी करीत आहे. ज्याठिकाणी ग्राहक ५००जुड्या खरेदी करत होते तेच आता १०० ते १५०जुड्या खरेदी करीत आहेत. पालेभाज्यांची दरवाढ झाली आहे.असे मत व्यापारी शशिकांत झेंडे यांनी व्यक्त केले आहे. पालकच्या दरात १५-२० रुपयांची वाढ झाली आहे. ९५% पालक हे पुणे हडपसर येथून दाखल होत असतो,मात्र त्याठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्याची आवक घटली आहे. आधी १८०० ते २४००डाग आवक होती ती आता ८०० ते ९०० डाग आवक होत आहे. आधी १० ते १२ रुपयांनी उपलब्ध असलेले पालक आता २५ ते ३० रुपयांवर विक्री होत आहे.

हेही वाचा : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कुल बसला खारघर येथे आग, बस चालक-मदतनीसाच्या प्रसंगावधानामुळे सर्व विद्यार्थी बचावले

पालेभाजी आधी आता
पालक १० ते १२रु २५ ते३०रु
मेथी १४ ते १६रु २०ते २२रु
शेपू ८ रु १२ ते १५रु
कोथिंबीर १२ ते १६रु १८ ते २०रु