Raigad Guardian Minister uday samant held Janata Darbar in Alibagh | Loksatta

नवी मुंबई: पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात उरणच्या समस्यांचा पाऊस

उरणमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर नागरी समस्या मांडल्या.

Raigad Guardian Minister uday samant held Janata Darbar in Alibagh
पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात उरणच्या समस्यांचा पाऊस

सोमवारी अलिबाग येथे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जनता दरबार अलिबाग मध्ये भरविला होता. यावेळी उरण तालुक्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या नागरी समस्यांचा पाऊस उरणमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री यांच्या समोर पडला. यावेळी कामगार नेते भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, शर्मिला कोळी, अरविंद घरत आदींनी समस्या मांडल्या.

हेही वाचा- राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे काळी विमान उडवत गाजर दाखवत निषेध आंदोलन

यामध्ये प्रामुख्याने मागील १५ वर्षांपासून रखडलेले उरणचे उपजिल्हा रुग्णालय, जेएनपीटी बंदरसाठी विस्थापित झालेले वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडाचे पुनर्वसन, प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पात रोजगार, वायू विद्युत केंद्रात झालेल्या स्फोटातील मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगाराच्या पत्नीला कायमस्वरूपी प्रकल्पात नोकरी आणि स्फोटात मृत्यू झालेल्या तिन्ही कामगारांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी. त्याचप्रमाणे २५ फेब्रुवारी २०२२ च्या सिडको प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यासाठी काढण्यात आलेल्या शासनादेश (जीआर) मध्ये प्रकल्पग्रस्तांची घरे व जमीनी कायम मालकी हक्काने कराव्यात अशी सुधारणा करावी व उरण तालुक्यातील चाणजे,नागाव आणि रानवड सह इतर गावातील उर्वरित जमिनी संपादीत करण्यासाठी काढण्यात आलेली १२ ऑक्टोबर २०२२ ची अधिसूचना रद्द करण्याची मागणी या जनता दरबारात उरणच्या जनतेच्या वतीने करण्यात आली आहे. या समस्या समजून घेण्यासाठी लवकरच उरणचा दौरा करणार असल्याचे पालकमंत्री यांनी घोषित केले आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-10-2022 at 16:29 IST
Next Story
नवी मुंबई: तळोजा, कळंबोलीत १९ लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त