पनवेल येथील करंजाडे गावाजवळील आदिवासी पाडय़ावर विनयभंग करणाऱ्या संशयित आरोपीला पोलीस ठाण्यात आणण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. दिलीप भगत आणि त्याच्या सात-आठ साथीदारांनी ही दगडफेक केल्याचे पोलिसांनी सांगितले. या दगडफेकीत युवराज पाटील आणि मुकुंद सोलणकर हे दोन पोलीस शिपाई जखमी झाले आहेत. मुलीचा विनयभंग होत असल्याची तक्रार घेऊन तिचे वडील पनवेल शहर पोलीस ठाण्यात गेल्यामुळे दिलीप भगत आणि त्याच्या मित्रांना राग आल्याने त्यांनी हे कृत्य केले. सात जणांच्या टोळक्यांनी केलेल्या हल्ल्यात सोलणकर यांच्या पोटावर आणि पाटील यांच्या पायाला आणि डोक्याला जबर जखमा झाल्या.या घटनेनंतर दिलीप भगत व त्याचे मित्र फरार झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2016 रोजी प्रकाशित
पनवेलमध्ये पोलिसांवर दगडफेक
या दगडफेकीत युवराज पाटील आणि मुकुंद सोलणकर हे दोन पोलीस शिपाई जखमी झाले आहेत.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 07-04-2016 at 09:36 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Threw stones on the police in panvel